Breaking News

मारेगाव येथे २० फेब्रुवारीला आरटीओ कॅम्प

◆ ड्रायव्हिंग लायसन्स , वाहन ट्रान्सफर होणार आता मारेगावात

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

सर्वच क्षेत्राशी दुर्लक्षित असलेल्या मारेगाव तालुक्यात आता आरटीओ कॅम्प सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.येत्या २० फेब्रुवारी रोजी स्थानिक सा. बा. विभागाच्या प्रांगणात (राज्य महामार्गाचे बाजूला ) हा कॅम्प होणार आहे.

मारेगाव तालुक्यातील वाहनधारकांना ड्रायव्हिंग लायसन्स , वाहन ट्रान्सफर करण्यासाठी वणी गाठावे लागत होते.त्यामुळे वाहन धारकांचा वेळ आणि आर्थिक भुर्दंडांना सामोर जावे लागत असल्याने मारेगाव येथील अजय रायपूरे यांनी आरटीओ कॅम्प मारेगावात सुरू करण्याच्या निवेदनाद्वारे हालचाली केल्या.प्रशासनाने ही गंभीर बाब हेरून मारेगावात कॅम्प सुरू करण्यावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील वाहन धारकांची परवड थांबणार आहे.

परिणामी , आजतागायत जिल्ह्यातील ०९ तालुक्यात मोटार वाहन निरीक्षकांचे शिबीर आयोजित करण्यात येत होते.उपप्रादेशिक विभागाने पक्की अनुज्ञप्ती व शिकाऊ अनुज्ञप्ती या कामकाजाचे शिबीर आता मारेगाव येथील अजय रायपूरे यांच्या यशस्वी प्रयत्नाचे फलीत समजले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment