मारेगाव तालुक्यातील सरपंच , उपसरपंच यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

◆ पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लक्षात घेता राजकीय पक्षात प्रवेशाचा ज्वर वाढला आहे.किंबहुना राजकीय संघटन मजबूतीवर भर देत मारेगाव तालुक्यातील सरपंच , उपसरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात ना.संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.

    मारेगाव तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वात मारेगाव तालुक्यात बाळासाहेब शिवसेनेची पक्ष संघटन मजबुतीवर भर देण्यात येत आहे.तालुक्यात पक्षाला ‘विशाल’ रूप देण्याची व्युव्हरचना आखण्यात येत असतांना मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी यवतमाळ स्थित पक्ष प्रवेश केला आहे.
तालुक्यातील पाथरी चिंचाळा येथील सरपंच गोवर्धन तोडासे , देवाळा सरपंच  सुरेश लांडे , वनोजा देवी उपसरपंच प्रशांत भंडारी , माजी उपसरपंच प्रवीण बलकी ,सोसायटी उपाध्यक्ष हरिभाऊ नगराळे , माजी उपसरपंच प्रवीण विखणकर , सामाजिक कार्यकर्ते गणपत वाढई , निलेश आत्राम , किशोर शेंडे , गजानन बोथले , प्रवीण गमे , दुर्गे पाटील यांनी पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत तर तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment