◆ अपघात ग्रस्त ट्रक देत आहे अपघाताला आमंत्रण
◆ मारेगाव पोलिसांचे दुर्लक्ष
मारेगाव
यवतमाळ राज्य महामार्गावर तीन दिवसापूर्वी उभ्या ट्रकला ट्रकने टक्कर दिल्याने अपघात झाला . या अपघाताला तीन दिवस उलटूनही सदर अपघात ग्रस्त ट्रक महामार्गावर मधात उभा असल्याने पुन्हा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
एकीकडे पोलीस विभाग नागरिकांना रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतूक नियमाचे महत्त्व पटवून देत आहे. चार चाकी, मालवाहू सह इतर वाहनावर रिफ्लेक्टर रेडियम तसेच मोटार वाहन कायद्याच्या नवीन तरतुदी बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांना मार्गदर्शनाचे डोज पाजले जात आहे. मात्र मारेगाव- यवतमाळ महामार्गावरील पेट्रोल पंपा जवळ अपघातग्रस्त वाहन मार्गावरच उभे ठाकले आहे. सदर महामार्गावर 24 तास वाहनाची वर्दळ सुरू असते. त्यामुळे रात्री बे रात्री अपघातग्रस्त वाहनामुळे आणखी एखादा मोठा अपघात होण्याची पोलीस विभाग वाट बघत आहे का? असा सवाल वाहनधारकासह नागरिक करीत आहे. त्यामुळे पोलीस विभागाने सदर अपघातग्रस्त वाहन तात्काळ हटवावे अशी मागणी होत आहे.