◆ शिवणी येथील तस्करांनी काढले डोके वर
(भाग – १)
विटा न्यूज नेटवर्क : दीपक डोहणे
वर्धा नदीत खोलवर भुयार सदृश्य खड्डा करून लाखो रुपयांची वाळू गिळंकृत करण्याचा विडा आता मारेगाव तालुक्यातील शिवणी येथील तस्करांनी उचलला आहे.त्यामुळे शासनाच्या महसुलला कात्री लावण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे.
मारेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या शिवणी व झगडा शिवारातून थेट रस्ता तयार करून हे तस्कर वर्धा नदीच्या तीरावर जाऊन वर्धा नदीच्या पात्रात भला मोठा खड्डा करून वाळूची तस्करी भयावह स्थितीत आहे.त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूलला चुना लावण्याचे कार्य सोज्वळपणे सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षतेवर आता प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे.
तालुक्यातील सीमेवर व अवैध वाळूची तस्करी करण्यासाठी सोयीचा मार्ग या बहाद्दर तस्करांनी काढला आहे. शिवणी येथील चार ते पाच तस्कर ही शासनाची मालमत्ता लयलूट करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.हे सर्व वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी असून आपल्या नेत्याच्या छत्रछायेखाली पापाचे धनी तर बनत नाही ना ? या बाबत साशंकता निर्माण होत आहे.
वाळू तस्करांना कुणाचाही अजूनही अंकुश लावण्यात प्रशासनास सपशेल अपयश येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
परिणामी , आजतागायत हजारो ब्रास वाळू फत्ते करण्यात यशस्वी ठरलेल्या तस्करांचे मुसके आवळण्याची वेळ आली असून प्रशासनाने गंभीर दखल घेऊन याकडे लक्ष केंद्रित करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील जनतेची आहे.