◆ मनसे देत आहेत कार्यकर्त्यांच्या कर्तुत्वाला चालना
झरी जामणी : नितीन कापसे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत वणी विधानसभा क्षेत्रात मनसे पक्ष बांधणी जोमात सुरू आहेत. मनसे सुप्रीमो राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी नव्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावात विधानसभा क्षेत्रात सुरु आहे. प्रमुख पदाधिकारी झपाट्याने पक्ष विस्तार करत आहे. तरुण, महिला व गावातील अन्य पक्षीय कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या कर्तुत्वाला चालना मिळावी व पक्ष संघटन मजबूत व्हावे यासाठी उंबरकर प्रयत्नरत आहे.
दरम्यान , नवनियुक्त पदाधिकारी यांचेवर पक्ष संघटनेची जबाबदारी देत
तालुका उपाध्यक्ष: गुलाब आवारी
तालुका उपाध्यक्ष: काशिनाथ कुमरे
तालुका सचिव :विनोद उलमाले
तालुका उपसचिव: सचिन कोठारी
विभाग अध्यक्ष :- सूरज गावंडे
विभाग अध्यक्ष: विकास झोडे
विभाग उपाध्यक्ष : अशोक शेरलावर
विभाग उपाध्यक्ष : विनोद पवार
निलेश कुळमेथे, कृष्णा खोबरे, साईकिरण कापडे, प्रवीण आवारी आदी कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
वणी पक्ष कार्यालयात झालेल्या नियुक्ती सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, झरी तालुका अध्यक्ष गजानन मिलमिले, मारेगाव शहर अध्यक्ष नबी शेख, मनविसेचे चांद बहादे , वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकर, शिवराज पेचे, जिल्हा उपाध्यक्षा अर्चना बोदाडकर, गितेश वैद्य, प्रवीण लेनगुळे , नितीन कापसे ,आदी कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.