◆ मारेगाव तालुक्यातील चोपन , पिसगाव येथील घटनेने शेतकऱ्यांत चिंतेचे सावट
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील चोपण येथील शेतात असलेल्या बंड्यातून तब्बल बारा क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे सावट पसरले आहे.किंबहुना तालुक्यात कापूस चोर सक्रीय असल्याने चोरट्यांना बेड्या ठोकण्यास पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
चोपण शिवारात असलेल्या पांडुरंग सुधाकर तुरंगे यांच्या साडेसात एकर शेतात बंडा उभारण्यात आला.यात बारा क्विंटल कापूस कुलूपबंद असतांना अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारच्या मध्यरात्री थेट चारचाकी वाहन लावून किमान एक लाख रुपये किमतीचा कापूस लांबविल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.याबाबतची तक्रार मारेगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
पिसगाव:मदनापूरचा चोरटा शिवारातून पसार
पिसगाव येथील किशोर बेलेकार यांच्या शेतातील उभ्या कपाशीच्या झाडाचा कापूस वेचणी करीत चोरून नेण्याच्या प्रयत्नात शेतमालक शेतात येताच कापूस चोर पळून जाण्याचा यशस्वी ठरला.दरम्यान जवळपास ५० किलो कापूस प्लास्टिक पिशवी सोडून या चोरट्याने पोबारा केला.सदर कापूस चोर हा मदनापूर येथील असल्याची माहिती शेतमालकाने दिली.या घटनेची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
सद्यास्थितीत कापूस हंगाम असतांना तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ माजविला आहे.वाढत्या चोरीच्या घटनेने शेतकऱ्यांत कमालीची दहशत आणि चिंता पसरली असतांना हे चोरटे पकडण्यास पोलिसांसमोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे.