◆ बोटोणी येथील शेतकऱ्याने स्वगृही केली इहलोकाची यात्रा
बोटोणी : सुनील उताणे
मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील शेतकऱ्याने नापिकीमुळे गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज गुरुवारला दुपारी ३ वाजता उघडकीस आली.
कवडू नेहारे (६०) असे गळफास घेऊन इहलोकाची यात्रा केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नाव आहे.यंदा अतिवृष्ठीने हातचे पीक नेस्तनाबूत झाले.उत्पादनातील प्रचंड घटीने आगामी काळातील कुटुंबाचा गाडा कसा हाकावा व शिरावर असलेल्या खासगी कर्जाने मागील काही दिवसांपासून त्यांच्यात अस्वस्थता होती.विचारांच्या असह्य वेदनेने आज दुपारी त्यांनी स्वतःचे निवासी गळफास घेत जीवनाचा अखेर केला.
मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी , दोन मुले व एक मुलगी आहे.