◆ अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा कयास
◆ आईवडिलांचा आधारवड हिरावल्याने खडकीत हळहळ
◆ सोईट कोसारा मार्गावरील घटना
विटा न्युज नेटवर्क : मारेगाव
वरोरा तालुक्यातुन दुचाकीने परतीचा प्रवास सुरु असतांना अज्ञात वाहनाने धडक देऊन रस्त्याच्या पडलेल्या युवकाचा मृतदेह आज गुरुवारला सकाळी निदर्शनास आला.या घटनेने खडकी येथे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
मारेगाव तालुक्यातील खडकी येथील गोलू उर्फ सुहास गजानन आडे (१८)हा युवक आपल्या नातेवाइक असलेल्या वरोरा तालुक्यातील बोरी येथून मूळगावी दुचाकीने येत असतांना सोईट कोसारा रस्त्यावर बुधवारच्या सायंकाळी अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.यात गोलू हा दुचाकीसह रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळला.यातच तो गतप्राण झाला.
सकाळी रहदारी सुरू असतांना ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. आईवडिलांना एकुलता एक मुलगा नियतीने हरविल्याने खडकी येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मारेगाव ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदना नंतर गोलूला सायंकाळी अखेरचा निरोप देण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.