◆ ब्रेकींग होताच खाली कोसळले
◆ दोन ठिकाणी फ्रॅक्चर
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव बस थांबा पासून सुटलेल्या एसटी ला मागावून धावत येऊन म्हाताऱ्याने खिडकीला पकडले.याच स्थितीत लटकलेल्या अवस्थेत काही अंतरावर हा थरार पाहून बस थांबते अन म्हातारा लुटकन खाली कोसळून जखमी होते. ही घटना मारेगाव पोलीस स्टेशन समोर आज बुधवारला दुपारी अडीच वाजताचे दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार , यवतमाळ वरून गडचिरोली येथे जाणारी बस क्रमांक एम.एच.४०, वाय – ५८३१ ही मारेगाव बस थांबा नजीक थांबली.निघतांना ऐंशी वर्षीय निळकंठ पैकाजी बद्दलवार रा.हिवरा मजरा त.मारेगाव हे वणी कडे जाण्यासाठी मागावून धावत येत असतांना सुटलेल्या बसच्या कंडक्टर मागील खिडकीला पकडले व याच अवस्थेत काही अंतर गाठत असतांना कंडक्टर बेल मारतो आणि पोलीस स्टेशन समोर जाऊन थांबते.बस थांबल्यागत प्रवासी म्हातारा अलगद खाली पडतो.या थरारक घटनेत जखमी वृद्धास ग्रामीण रुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले. हात व पायाला फ्रॅक्चर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी ‘विटा’ ला दिली.
या थरारक घटनेचा लाईव्ह अनेकांनी डोळ्यात साठवला मात्र नशीब बलवत्तर म्हणून बावाजी थोडक्यात बचावले.बस चालक व वाहक यांनी बावाजीस रुग्णालयात दाखल करून प्रकृतीकडे लक्ष केंद्रित करून आहे.पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.