विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील सिंधी (महागाव) येथील एका वृद्ध महिलेने आजारपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना 6 जानेवारी रोजी रात्री घडली.
मिराबाई रामदास झाडे वय 65 वर्षे रा.सिंधी त.मारेगाव असे मृतक वृद्ध महिलेचे नाव आहे. मृतक महिलेला दम्याचा आजार होता. कडाक्याची थंडी पडत असल्याने आजार चांगलाच बळावला. आजाराचा त्रास असह्य झाल्याने वृद्ध महिलेने सहा जानेवारी रोजी रात्री राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. घरच्या मंडळीच्या लक्षात येत असतील मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मागे दोन मुले , सून, नातवंड असा आप्त परिवार आहे. याबाबत मारेगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.