हूडहुडी ‘तिच्या’ जीवावर बेतली

◆ शेकोटीने केला घात
◆ वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

सध्या कडाक्याची थंडी असल्याने घरोघरी शेकोटी पेटवली जात आहे. अशातच शेकोटी जवळ शेकत असताना अचानक आग लागल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ८ जानेवारी रोजी घडली.
शकुंतला पुंडलिक भोयर रा. मांगली ता. मारेगाव वय 75 वर्ष असे जळालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. सध्या वातावरणाचा पारा घसरला आहे. त्यामुळे वृद्धासह सामान्य नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. अशातच मृतक महिला 7 जानेवारी रोजी सकाळी उठली व शेकोटी पेटवली. शेकत असताना नकळतपणे वृद्ध महिलेच्या ब्लॅंकेट ला आग लागली. आगीने चांगलाच भडका घेतला. घरच्या मंडळीच्या लक्षात येतात तात्काळ आग विझवून तिला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अशातच उपचार सुरू असताना दिनांक 8 जानेवारी रोजी पहाटे च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे मुलगा, सून, नातवंड असा आप्त परिवार आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment