एनएमएमएस कार्यप्रणालीत दुरुस्ती करून पूर्णवेळ व प्रति माह वेतन द्या

झरी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे निवेदन

झरी जामणी : नितीन कापसे

राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक मित्रांच्या सहकार्याने राज्यात एनएमएमएस द्वारे रोहयोच्या कामावरील मजुरांची हजेरी घेण्यास ग्राम रोजगार सेवकांनी विरोध दर्शवला आहे.
ग्राम रोजगार सेवक हा २००६ पासून पूर्णवेळ काम करत होता. परंतु अचानक शासनाने घुमजाव करीत पूर्णवेळ काम करत असलेल्या ग्राम रोजगार सेवकांना २ मे २०११ साली अर्धवेळचा शासन निर्णय काढून ग्राम रोजगार सेवकांवर मोठा अन्याय केला. मात्र ८ मार्च २०२१ चा शासन निर्णय काढून आणखी दुसरा अन्याय केला.

हा अन्याय सहन करणे पुरे झाले. १ जाने.२०२३ पासून रोहयोच्या कामावरील मजुरांची हजेरी एनएमएमएस द्वारे घेण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने आदेश काढला. दिवसातून दोन वेळा कामावरील मजुरांची हजेरी घ्यावी. ग्रामरोजगार सेवक हा शासन निर्णय नुसार अर्धंवेळ आहे. अनेक ग्राम रोजगार सेवकांकडे मोबाईल नाही. असेल तर रिचार्ज कुठून करावा. एका कामावरून दुसऱ्या कामावर हजेरी घेण्यासाठी शेतातून किंवा जंगलाने हजेरी घेण्यास फिरावं लागते. हिंस्त्र प्राण्यांपासून धोका होऊ शकतो. म्हणून विमा कवच पाहिजे. या विषयावर शासनाने कधी विचार न करता ग्राम रोजगार सेवकांवर दडपणशाही करून काम करून घेत आहेत. सर्व राज्यात आज सार्वजनिक कामावर हजेरी न घेण्याच्या निर्णयाचा अवलंब केला आहे.
अनेक तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सादर करत आहेत आणि काम बंद आंदोलन यशस्वी करत आहेत. आपणा‌स सतत ४५ दिवस काम बंद आंदोलन चालू ठेवायचे आहे. त्या अनुषंगाने मा.आयुक्त नरेगा व केंद्र शासनाच्या पत्रानुसार दि.१ जाने.२०२३ पासून एनएमएमएस द्वारे मजुराची हजेरी घेण्याचे सूचित केले असून या पद्धतीनुसार महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना कामावर पूर्णवेळ द्यावा लागतो. एक किंवा एकापेक्षा जास्त मजुर असेल तर प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाला सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत हजेरी घेण्यासाठी व्यस्त राहावे लागते. त्यासाठी जोपर्यंत ग्राम रोजगार सेवकांना अर्धवेळ या शासन निर्णयात दुरुस्ती करून पूर्णवेळ काम व प्रति माह वेतन असा शासन निर्णय काढण्यात येत नाही, तोपर्यंत एनएमएमएस या पद्धतीनुसार महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवक काम करण्यास तयार नाही. जर शासनाने तात्काळ सदर निवेदनावर धोरणात्मक निर्णय न घेतल्यास मुंबई मंत्रालय आझाद मैदान येथे ग्राम रोजगार सेवकांचा भविष्यात भव्य मोर्चा काढण्यात येईल. या आशयाचे निवेदन ग्राम रोजगार सेवक संघटना झरीजामणी कडून मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती झरीजामणी यांना देण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment