◆ दहावीत प्रथम आता गिरवितो कृषी तंत्रज्ञानाचे धडे
◆ मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील सौनकचा अनाकलनिय शैक्षणिक प्रवास
मारेगाव : दीपक डोहणे
मोलमजुरी करणाऱ्या मायबापाचा सौनक वीस वर्षाचा होतोय.जन्मजात त्याला दोन्ही हात नाही.पायाच्या बोटात चमच घेऊन पोट भरतो व पेन घेऊन लिखाण करतोय.दहावीत फस्ट क्लास व बारावीत पन्नास टक्के गुण प्राप्त करीत तो आता मुक्त विद्यापीठातून बी.ए. व कृषी तंत्रज्ञानाचे धडे गिरवित शैक्षणिक क्षेत्रातील फिनिक्स भरारी घेत आहे.मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील सौनक सुचेंद्र-ज्योती राऊत हा सॅल्युट अन कौतुकास पात्र ठरतो आहे.
शारीरिक व आर्थिक संपन्न असलेले विद्यार्थ्यां अलीकडेच शैक्षणिक क्षेत्रात भरकटलेल्या अवस्थेत दिसतो आहे.पण पिसगाव येथील सौनक हा दोन्ही हात नसतांना अपवाद ठरतो आहे किंबहुना मारेगाव तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत असलेला सौनकचा जिंदादिल स्वभाव , शिक्षणातील जिद्द , चिकाटी आत्मविश्वासाच्या बळावर पदवी प्राप्त करण्याच्या रुळावर धावतो आहे.
कुटुंबातील परिस्थिती बेताची.मोलमजुरी करणारे मायबाप.सौनक जन्माला येतात त्याला दोन्ही हातच नव्हते.हे अपंगत्व पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.मात्र आलेल्या प्रसंगावर मात करीत सौनक आज वीस वर्षाचा होतोय.प्राथमिक शिक्षण गावात घेत माध्यमिक शिक्षणही जिद्दीने घेत पायाच्या बोटाने लिहीत तो पुढे सरकतो आहे. दहावीत ६० टक्के गुण प्राप्त केले.बारावीत ५० टक्के घेत तो उत्तीर्ण झालाय.आता थेट मुक्त विद्यापीठाच्या पदवी प्राप्तीसाठी साठी बीए करतोय तर मारेगावात कृषि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतो आहे.
नव्वद टक्के अपंगत्व असलेला सौनक ऑटोरिक्षाने प्रवास करीत शिक्षणाप्रती जिद्द व शैक्षणिक यश त्याचे लक्षणीय ठरते आहे. स्वतःच्या क्षमतेची जाणीव होऊन आपल्या मार्गाने जाण्याचा त्याचा निश्चय अनाकलनीय ठरतो आहे.सर्वांसाठी अभिमानाचा ताईत बनलेल्या सौनकच्या जिद्दीला सॅल्युट नाही केला तर कुणाचे उर अभिमानाने भरून येणार नाही हे मात्र मानवी मनाच्या भावनेला सहृदय स्पर्श करून जाते.
जीवनाच्या काटेरी वाटेत ‘जित’ संपादन केलेला व सवंगड्यांना आपुलकीची वागणूक देणारा दिलदार स्नेही. प्रभागाची धुरा सांभाळत जागृती विचार मंच संघटनेची प्रमुख म्हणून सामाजिक / राजकीय क्षेत्रात सदैव अग्रणी व्यक्तिमत्त्व.विकासासाठी तत्पर असलेल्या आमच्या भावास जन्मदिनी आपुलकीचे अप्रतिम सौंदर्य प्रदान करतांना प्रत्येक क्षेत्रातील यश लोटांगण घालत निरोगी व उदंड आयुष्य लाभो.ह्याच ३६४ दिवसासाठी दिलखेचक शुभेच्छासह – दीपक डोहणे