रामेश्वर येथीलअल्पभूधारक शेतकऱ्याने केले विष प्राशन

◆ मारेगाव तालुक्यात आत्महत्येचा चढता आलेख चिंताजनक

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

येथून जवळ असलेल्या रामेश्वर येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांने नापिकीला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारला रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी उघडकीस आली.
प्रमोद वेंकटेश एकरे वय 27 वर्षे राहणार रामेश्वर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी तो शेतातील तूर मोडणीकरिता गेला होता .रात्र होऊन घरी परतला नसल्याने घरच्या मंडळीने त्याचा शेतात शोध घेतला. यादरम्यान तो शेतातील गोठ्यामध्ये मृत अवस्थेत आढळला. अत्यल्प उत्पादन व शिरावर असलेल्या कर्जाने मागील काही दिवसापासून तो विवंचनेत होता. त्यामुळे त्यानें टोकाचा निर्णय घेतला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. मृतक वेंकटेश यांच्या मागे दोन मुले पत्नी आई वडील असा आप्त परिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment