जम्बो नाली : व्यापाऱ्यांची तहसीलदारांकडे धाव

◆ व्यापारी व ग्राहकांना ठरतेय अडसर

झरी जामणी : नितीन कापसे

तालुक्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रोडचे व नालीचे बांधकाम चालू आहे. परंतु शहरात सुरू असलेल्या नालीमुळे व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. सदर नालीची उंची कमी करून व खोदकाम करून नालीचे बांधकाम करण्यात यावे अशी येथील व्यावसायिकांची मागणी आहे.
विकासाचा एक भाग म्हणून सध्या शहरात सुरू असलेल्या नालीची ऊंची जवळपास ४ फूट उंच आहे. त्यामुळे ग्राहकांना व दुकानदारांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी व्यापारी वर्गाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहेत.
दरम्यान , दुतर्फा रस्त्याने छोटे मोठे प्रतिष्ठाने वसलेले आहे.प्रतिष्ठाण लगतच जम्बो नालीचे बांधकाम दुकानदार व ग्राहकांना अडसर निर्माण करीत असून प्रशासनाने योग्य व सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढावा या प्रमुख मागणीसाठी पदाधिकारी यांनी प्रशासनास साकडे घातले आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक प्रवीण लेंनगुळे , आरोग्य सभापती दिनेश जयस्वाल, रोहीत मालेकर ,अमोल तेलंग,संभाजी पेंदोर, प्रशांत पांडे, जयंता ताजने, देविदास भोयर आदींची उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment