जागृती… मारेगाव येथे उद्या कोलाम समाज संवाद परिषद

◆ जिल्हा क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेचा पुढाकार

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

कोलाम जमातीत सामाजिक अभिसरणाची क्रांती प्रतिबिंबित व्हावी या उदात्त हेतूने मारेगावात उद्या दि.६ जानेवारी ला कोलाम समाज संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक बदकी भवन येथे दुपारी १२ वाजता सुरू होणाऱ्या परिषदेचे उदघाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे करणार आहे.संघटनेचे राज्य संघटक लेतूजी जुनघरे हे अध्यक्षस्थानी असतील.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन , उपायुक्त डॉ. सचिन मडावी , पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड , उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार ,उपविभागीय अधिकारी शरद जावळे , तहसीलदार दीपक पुंडे , ठाणेदार राजेश पुरी , बिडीओ किशोर गज्जलवार , कोरो इंडियाचे संचालक महेंद्र रोकडे , संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम, इकोनेटच्या संचालक गौरी भोपटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
परिषदेत कोलाम जमातीच्या सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक , आर्थिक , राजकीय , स्वातंत्र्य , समता , बंधुत्व आदी विषयांकितावर प्रबोधन होणार असून जमातीला मुख्य प्रवाहात येण्यासाठी सकारात्मक संवाद साधून विविधांगी प्रश्नांचे निराकरण केले जाणार आहे.
जिल्ह्यातील तमाम आदिम जमातीतील बांधवांनी संवाद परिषदेला हजर राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment