Breaking News

मारेगाव तालुका मनसे अध्यक्ष अविनाश लांबट यांचा राजीनामा

◆ मनसे च्या खेम्यात तर्कवितर्काला उधाण

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

नाराजी नाट्याची झालर असलेल्या मारेगाव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांचेकडे सुपूर्द केला आहे.या पदमुक्तीने राजकीय पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याचा राजीनामा दबक्या आवाजात चर्चेचा विषय ठरतो आहे.
मारेगाव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाळे प्रत्येक गावात विणल्या गेले.अनेक गावातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते मनसे च्या उंबरठ्यावर आहे.एकूणच तालुक्यातील पक्षाची घट्ट मोट सर्वश्रुत असतांना अध्यक्षाचा राजीनामा मनातील सलगीचे कारण ठरले आहे.
दरम्यान, तालुका अध्यक्ष लांबट यांनी आपल्या पदाचा राजीनामा उंबरकर यांचेकडे पाठवून प्रत्यक्ष भेट घेत पदमुक्त करण्यासाठी साकडे घातले.मारेगाव तालुक्यातील अध्यक्ष पदाची धुरा आता कुणाच्या खांद्यावर ? हा प्रश्न तूर्तास अडगळीत आहे.

विद्यमान अध्यक्ष यांनी खासगी कारणाने राजीनामा दिला असला तरी मंजूर करण्यात आला नाही.यावर पक्ष प्रमुखांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
संतोष रोगे
जिल्हा उपाध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण सेना- यवतमाळ

कौटुंबिक व वैयक्तीक कारणाने मी राजीनामा दिला आहे. यापुढे मनसेचा शिलेदार म्हणून कार्यरत राहून पक्ष वाढीसाठी माझा प्रयत्न अविरत राहील.
अविनाश लांबट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment