◆ विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा
◆ 70 टक्केच्या वर नुकसान मात्र मदत तोकडी
विटा न्यूज नेटवर्क : कैलास ठेंगणे
मारेगाव महसूल विभागात खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने पिकाचे 70 टक्के च्या वर नुकसान केले. पिक विमा कंपनीने तसे पंचनामे केले. मात्र प्रत्यक्षात मदत केवळ 20 टक्के मिळत असल्याने पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची धक्कादाय बाब समोर आली आहे. त्यामुळे विमा कंपनीला कुणाचे पाठबळ असा सवाल शेतकरी करीत आहे.
दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पूर चक्रीवादळ गारपीट अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची अपरिमित हानी होते. अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने पिक विमा योजना सुरू केली. ह्या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता सरकार लाखो रुपये खर्च करते. यावर्षी तालुक्यातील जवळपास 17 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या काळापासूनच नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्याला नागविले. अतिवृष्टीने पिकाचे होत्याचे नव्हते झाले. कापूस तूर सोयाबीन आदी पिके पाण्याखाली आली .त्यामुळे पिकाचे पूर्णतः नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णतः नुकसान झाल्याने राज्य सरकारने मदतही जाहीर केली व दिली. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊन पिक विमा मात्र हेक्टरी पाच हजार रुपये पर्यंतची तोकडी मदत शेतकऱ्याला देत आहे. अतिवृष्टीने पूर्ण हिरावलेला शेतकरी पिक विम्याचा परतावा चांगला मिळेल. या आशेत असताना पिक विमा कंपनी शेतकऱ्याची थट्टा लावली आहे. त्यामुळे वीमा कंपनी प्रति शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
वकिली करता तर जबाबदारी घ्या
खरीप हंगाच्या सुरुवातीला प्रशासन पातळीवर पिक विमा योजना साठी कृषी विभाग महसूल विभाग झाडून कामाला लागतो शेतकऱ्यांनी पिक विमा भरावा यासाठी आव्हाने चित्ररथ काढले जातात प्रशासन विमा कंपनीची एवढी वकिली करीत असेल तर आता एवढे नुकसान होऊ नये पिक विमा योग्य मिळत नसेल तर त्याची जबाबदारी प्रशासनाची आहे अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.
यंदा शेतकऱ्याचे 70% च्या वर शेत पिकाचे नुकसान झाले आहे . त्यामुळे प्रत्यक्ष विमा प्रतिनिधींनी सुद्धा 70 ,80 टक्के नुकसानीचे पंचनामे केले. मात्र प्रत्यक्षात पिक विमा कंपनी किती टक्के रक्कम देते , हे आम्हाला कळत नाही.
तालुका कृषी अधिकारी
सुनील निखाळजे
मारेगावंमला हेक्टरी 4667रुपये विमा मिळाला. मात्र प्रत्यक्षात माझे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले होते. विमा कंपनी शेतकऱ्यांना वेटीस धरत असल्याने पुढील वर्षी विमा भरणार नाहीत.
सचिन धाबेकर
कुंभा, शेतकरी
तुटपुंजी मदत नाही दिलेलीच बरी
वरुन तेच बोलणार तुम्हाला पैसे दिले नाही का म्हणुन
३७०० रु तर आम्ही आमच्या सालगड्या ला बोनस म्हणुन देतो…!
# धिक्कार असो