पांढऱ्या सोन्याचे भाव घसरले

◆ शेतकरी हवालदिल
◆ आर्थिक फटका सहन करण्याची वेळ

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव 

नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे पिकाचे दर यंदा सातत्याने कोसळत आहे. गेल्या एका महिन्यात हे दर सोळाशे ते अठराशे रुपये कमी झाल्यामुळे परिसरासह तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे आर्थिक फटका सहन करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. काही शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस विक्रीस काढला होता .मात्र त्यांचा भ्रमनिराश झाल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी १४५०० रुपये प्रति क्विंटल उच्चाकी दर भेटलेल्या कपाशी पिकाला यंदा मात्र सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. गेल्या वर्षी कपाशीची पिक शेतकऱ्यांच्या घरात आल्यापासून सातत्याने दरवाढ झाली होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरात वर्षांनुवर्ष साठवूनक केलेला संपूर्ण कापूस विकला. यात पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कपाशी पिकाला गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी सोन्यासारखे भाव मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र पीक घरात येताच कपाशी पिकाचे दर कोसळत चालले आहे. यामुळे बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी घरात साठवलेला कापूस घरात ठेवणे पसंत केले आहे. मात्र काहींनी बाजारात कापूस आणला. मात्र त्यांना तोटा सहन करावा लागला आहे. येत्या काही दिवसात कापसाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्याना लागली आहे.

शेतकरी काय म्हणतात…
बाजारपेठेत सरकीचे भाव तेजीत असताना कपाशीचे भाव मात्र घसरले आहे. कमी भावामुळे कपाशी साठवून ठेवावी की विकून टाकावी काहीच कळेना से झाले आहे. मागील वर्षे तुलनेत यंदा उत्पन्नात मोठी घाट आहे. त्यामुळे मोठा आर्थिक ताण पडला आहे.
– राजू महाजन
शेतकरी कुंभा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment