युवा शेतकऱ्याने घेतला शेतात विषाचा घोट

◆ उपचारार्थ नेताना वाटेतच मृत्यू
◆ देवाळा येथील घटना

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मारेगाव तालुक्यातील देवाळा येथील युवा शेतकऱ्यांने शेतातच विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दि.२८ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली.
जनार्धन कवडू महाकुलकर (३८) असे विष घेऊन आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्यांचे नाव आहे.यंदाच्या अतिवृष्ठीने शेतातील पिकाचे होत्याचे नव्हते झाले.तेव्हापासून जनार्धन हा सातत्याने अस्वस्थ राहायचा. खासगी व बँक कर्ज त्याचे शिरावर असतांना आज देवाळा शिवारात असलेल्या शेतात विष प्राशन केले.काही वेळात शेजारच्या शेतकऱ्यांना ही बाब निदर्शनास आली. मारेगाव रुग्णालयात हलवितांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.मृतक शेतकऱ्याच्या पश्चात आई , वडील , पत्नी व एक मुलगी एक मुलगा असा आप्तपरीवार आहे.
वाढत्या शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत असतांना पुन्हा या घटनेने देवाळा वासीयात हळहळ व्यक्त होते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment