◆ ती माहेरी, सासू पोलिसांच्या ताब्यात,पोलिस पथक त्याच्या शोधात
◆ डॉक्टरकडे तपासणी साठी गेले आणि बालविवाह कायद्याच्या कात्रीत अडकले
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
झोपडी वजा घरात तिचे छोटेखानी लग्न होते.तो सोनेरी दिवस समोर ढकलत असतांना अवघ्या महिन्यात कामानिमित्त बाहेर पडतो.तब्बल दोन तीन महिन्यापासून संपर्कात नसलेल्या तिच्या मनाची घालमेल होत प्रकृतीत बिघाड होते.मूळ गावाकडील डाक्टरकडे तिची तपासणी होताच तिच्या पोटात अंकुराची वाढ होत असल्याने बालविवाहाचे बिंग फुटते.आणि कायद्याच्या कचाट्यात तिची आई व नवरोजी अलगदपणे अडकते.या बहुदा तालुक्यातील पहिल्या वहिल्या घटनेने सारेच चक्रावले आहे.पसार नवरोजीच्या शोधात पोलीस पथक पालथे घालत असून आई पोलिसांच्या ताब्यात आहे.
मारेगाव तालुक्यातील करणवाडी गावात दहा पंधरा कुटूंबातील भटकी जमात चंद्रमौळी झोपडी वजा वास्तव्यात आहे.मिळेल ते काम करायचे आणि कुटुंबाचा गाडा हाकायचा असा त्यांचा दिनक्रम.त्यांची अल्पवयीन मुले शिक्षण सोडून भीक मागत कुटुंबाला आधार देण्याचे काम नित्याचेच असल्याचे चित्र मारेगावात नेहमीच निदर्शनास येतेय.
नागपूर जिल्ह्यातील सालेभट्टी येथील राऊत कुटुंबातील अंकुश नामक चोवीस वर्षीय युवकाचा अवघ्या बारा वर्षीय बालिकेसोबत विवाह झोपडीवजा निवडक कुटुंबातील उपस्थितीत पार पडला.सुरुवातीला काही महिने गोड्यागुलाबीने संसार सुरू झाल्यागत संसारवेल अर्थात तिच्या पोटातील अंकुराची वाढ होत गेली. आणि अंकुश कामानिमित्त बाहेर गेला व आऊट ऑफ कव्हरेज झाला.तिच्या शरीरातील कमालीची वाढ अन बिघाड यामुळे तिच्या आईने दवाखान्यात नेले.नाव आणि वयाची नोंद यामुळे डॉक्टरांकडे ‘ बालविवाह ‘ च्या कात्रीत सापडले.थेट डॉक्टरांनी हे गंभीर प्रकरण मारेगाव पोलिसात वर्ग करीत अंकुश व तिच्या आईवर वर गुन्हा दाखल केला.आणि बालविवाह करणे चांगलेच महागात पडले.
महत्वाच्या कारणांची किनार
मुलींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे पालक.लवकर विवाह म्हणजे वधूची पवित्रता आणि कौमार्य याची खात्री करण्याचा एक मार्ग आहे.शिक्षणाचा अभाव , बालविवाहाच्या दुष्परिणाम विषयी जागृतीचा अभाव, कायद्याची अंमलबजावणी व इंच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाकडून कार्यवाहीत उदासीनता ही बालविवाह झाल्याची महत्वपूर्ण कारण या प्रकरणाला किनार मिळाली.पोलीस पथक रवाना
बालविवाह प्रकरणात गुन्ह्यात अडकलेल्या व आपली जबाबदारी विसरून पोबारा केलेल्या संशायित नवरोबाला शोधण्यासाठी मारेगाव पोलीस पथक पालथे घालत असून उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांच्या नेतृत्वात चार पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे.