◆ येथील शाळेत भरला वर्ग
विटा न्यज नेटवर्क : कैलास ठेंगणे
आयुष्यात काही आठवणी खरच खूप छान असतात. त्यात शाळेचे रम्य दिवस सर्वांनाच हवेहवेसे वाटतात .ते दिवस त्याच सवंगड्या सोबत पुन्हा आठवायला मिळणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच. असा आनंदायी, मित्र-मैत्रिणीचा आनंद संवाद, येथील भारत विद्या मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये रंगला. निमित्त होते मैत्री संमेलनाचं. सन 1998 /99 च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी चोवीस वर्षांनी एकत्र जमले होते. यावेळी माजी शिक्षकासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी त्यामध्ये गप्पा, किस्से ,आठवणी ,काही गोड तर काही कटू ,धमाल गाणी अशा साऱ्याच रंगाने हा सोहळा भरभरून उजळला होता. या मैत्री संमेलनाने मैत्रीचे धागे अधिकच घट्ट झाले. धावपळीच्या आयुष्यात वेळ काढत सर्वांनीच या क्षणाला आठवणीच्या कुपीत बंद करून जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला.
विद्यार्थ्यांनी या संमेलनाला आपल्या माजी शिक्षकांना देखील आमंत्रित केले होते यात प्रामुख्याने बाबाराव ठाकरे, संजय देवाळकर ,अंबादास कुटे, गौतम तामगाडगे ,गणपत गोलर, गुलाब बाभडे ,दिगंबर उरकुडे, विठ्ठल इंगोले, लक्ष्मीकांत भुजाडे, महाजन ,बबन गोखरे आदी शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचा यथोचित सत्कार केला. काही विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करीत भावनांना वाट मोकळी करून दिली. विद्यालयातील माजी विद्यार्थी जयवंत ठेपले, महेंद्र पोंगडे, अजित सुराणा, प्रदीप उरकुडे ,विलास बर्डे ,मंगला ठक यांनी आयोजना करीत करिता पुढाकार घेतला. मित्र व मैत्रिणीची तब्बल 24 वर्षांनी भेट होणार असल्याने आयोजनात कुठलीही कमतरता पडू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. अनेकांनी आपल्या शालेय जीवनात आलेल्या अनुभवाना उजाळा दिला. सर्व विद्यार्थ्यांसाठी नाश्ता तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. नियमितपणे असे आयुष्यभर एकत्र राहू असे यावेळी ठरविण्यात आले. यावेळी तब्बल 99 विद्यार्थी विद्यार्थिनी सह परिवारासह उपस्थिती झाल्या होत्या. या कार्यक्रमाकरिता संतोष शेंडे, देविदास चौधरी, अमोल सरोदे ,नरेंद्र नेहारे, महेंद्र मुंघाटे, खुशाल घुगल, सुनीता गुरूनुले, संध्या ठाकरे ,मीनाक्षी राजूरकर, रेणू अंगणवार ,प्रवीण डाहुले, देवेंद्र देवतळे ,प्रदीप काकडे, गजानन ठोंबरे ,बेबी बोथले, मारुती बेसेकर, स्वाती भुजाडे, अर्चना आसुटकर, सीमा आवारी, मंगला ठाकरे ,नीलिमा चांदेकर, प्रतिभा नागबिडकर ,माया शेंडे, प्रवीण बेसेकर, दिनकर चौधरी आदींनी पुढाकार घेतला.