खडकी फाट्यानजीक अँटो पलटी १२ मजूर जखमी

◆ जखमीत शिवनाळा येथील ११ महिलांचा समावेश
◆ गंभीर जखमींना यवतमाळ हलविले

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील मजूर अँटोने मारेगाव कडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून अँटो पलटी झाल्याने तब्बल १२ मजूर जखमी झाल्याची घटना आज दि.२६ रोजी सकाळी १० वाजता राज्य महामार्गावर असलेल्या खडकी फाट्यानजीक घडली.
तालुक्यातील शिवनाळा येथील महिला मजूर अँटो ने मारेगाव तालुक्यातील गोधणी येथील शेतकामासाठी जात असतांना राज्य महामार्गावर खडकी फाट्या नजीक अँटोला श्वान आडवा आल्याने अँटो अनियंत्रित होत पलटी झाला.यातील बारा शेतमजूर जखमी झाले.जखमीत पार्वती रामभाऊ आत्राम (२७), शकुली भुतू टेकाम (२०) , अर्चना पैकू आत्राम (१७), संगीता भीमा आत्राम (१७), मंगला रामेश्वर टेकाम (२७), राजाबाई नागो टेकाम (२५) , तानेबाई भीमा आत्राम (६०), रविना शालीक टेकाम (२२), कांता पैकू टेकाम (४०), ज्योती सुनील आत्राम (२९), अर्चना राजू टेकाम (२५) या महिला मजुरांचा समावेश असून राजू टेकाम (४२) हा शेतमजूर जखमी आहे.हे सर्व मजूर मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील आहे.
अपघात होताच जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन बहुतांश गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment