◆ खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे प्रतिपादन
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करतो, हे अत्यंत खेदाची बाब आहे. कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्यानंतर त्यांच्या वारसांचे वाताहात रोखण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांची गरज ओळखून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व समजून पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.दुष्काळी परिस्थिती, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शिधा किट वाटपाचा कार्यक्रम शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे 20 डिसेंबर रोजी दुपारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रपूर- वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या सौजन्यने आत्महत्या ग्रस्त कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढे धान्य किटचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी सभापती जिल्हा परिषद अरुणाताई खांडाळकर, जेष्ठ नेते मुन्नाभाई कुरेशी, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव वसंतराव आसुटकार , तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकर, जिल्हा सरचिटणीस रमण डोये, शहर अध्यक्ष शंकर मडावी, वसंत जिनिंग संचालक रवींद्र धानोरकर, अशोक धोबे, गजानन खापणे, यादवराव काळे, अंकुश माफुर, धनंजय आसूटकर, समीर सय्यद, मंजुषा मडावी, अरविंद वखनोर, विनोद आत्राम, नंदू असुटकर आदी. उपस्थित होते.