मारेगाव तालुका ग्रा.पं. निवडणूक निकाल जाहीर…नऊ ग्रामपंचायतने निवडले कारभारी

◆ स्वप्नाळू उमेदवारांना जोर का झटका

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

नुकत्याच झालेल्या मारेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदार राजानी नऊ कारभारी नियुक्ती केले.विजयी सरपंच व सदस्यांनी गुलाल उधळीत जल्लोष केला तर पराभूत उमेदवारांनी निकाल स्थळावरून काढता पाय घेतला.

मारेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेमधून सरपंच पदाची निवडणूक पार पडली.यात नऊ ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी ३५ उमेदवारांनी नामांकन दाखल केली होते.

परिणामी आज तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आलेल्या सरपंच व सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली.

तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेल्या प्रामुख्याने सरपंच पदाच्या निवडणुकीत मार्डी -येथील तिहेरी लढतीत एकतर्फी विजयाची माळ येथील मतदार राजांनी रविकांत चंदनखेडे (५०५) यांच्या गळ्यात टाकली.वेगाव- येथील वर्चस्वाच्या लढतीत उषा अनिल देरकर (६६१)यांनी मुसंडी मारली.नवरगाव -चौरंगी लढतीत सुचिता फुलू कुमरे (३५९)विजयी ठरल्या.शिवणी धोबे- काँग्रेस प्रणित गटाचे निलेश रासेकर (३३८), वनोजादेवी- तिहेरी लढतीत डिमन गोवर्धन टोंगे(३६६) या तिहेरी लढतीत विजयी ठरल्या.कानडा-प्रतिस्पर्धी लढतीत सुषमा रुपेश ढोके(२९१) , कोसारा- दुहेरी लढतीत छाया अंकुश खाडे(४५२) ह्या विजयी झाल्या.गौराळा – मयुरी चंद्रकांत धोबे(२३४) तर इंदिरा पिदूरकर (२९३)या हिवरी येथून निवडून येत गावाचा कारभार चालविणार आहे.

दरम्यान , विजयी उमेदवार समर्थकांनी गुलाल उधळीत जल्लोष केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रघुनाथ कांडारकर , संदीप वाघमारे , सुधाकर जाधव यांचे सह सहाय्यक म्हणून किरण मेश्राम , विवेक राऊत , कर्नू कुडमेथे यांनी काम पाहिले.पोलीस प्रशासनाच्या तगड्या बंदोबस्तात निवडणूक निकाल शांततेत पार पडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment