◆ आरोचे पाणी नेताना नागरिकांना काळोखाचा सामना करावा लागत होता…
विटा न्यूज नेटवर्क : सुनील उताणे
मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील आरो प्लॅन्ट शेजारी वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण होते.ग्रामपंचायत दुर्लक्षित कारभार ‘विदर्भ टाईम्स’ चव्हाटय़ावर आणून दि.१८ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले.वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे होत अवघ्या तासातच ‘दिवे’ लावले.
फिल्टर पाण्यासाठी बोटोणी येथे आरो प्लॅन्ट उभारण्यात आला.रात्री वेळेत या समोरील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असतांना किर्रर्र अंधारात ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांत कमालीचे भितीदायक वातावरण निर्माण करीत होते.
नागरिकांच्या मूलभूत गरजेवर आणि संवेदनशील प्रश्नावर विदर्भ टाईम्स ने प्रकाश टाकल्यागत प्रशासन खडबडून जागे होत आरो प्लँट समोर अवघ्या वेळेत दिवे लावले.
बहुतांश नागरिक रात्रीच्या वेळेत पाणी नेत असल्याने प्रशासनाने दिवे लावताच काळोखाच्या वाटा प्रकाशमय झाल्या.विदर्भ टाईम्स च्या वृत्ताची दखल बोटोणी येथील नागरिकांना न्यायिक भूमिकेचा परिपाक ठरल्याने समाधान व्यक्त होत आहे.