बोटोणी आरो प्लॅन्ट ला अंधाराच्या वाटा

◆ नागरिकांत भितीचे वातावरण
◆ ग्रामपंचायत प्रशासन कुंभकर्णी झोपेत

विटा न्यूज नेटवर्क : सुनील उताणे

स्वच्छ पाण्यासाठी उभारण्यात आलेले बोटोणी येथील आरो प्लान्ट नजीक ग्रामपंचायत प्रशासनाकडून ‘दिवे’ लावण्यात सपशेल अपयशी ठरत आहे.बहुतांश नागरिक सूर्यास्तानंतर पाणी नेत किर्रर्र अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संभाव्य शक्यतेने नागरिकांत कमालीचे भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
आदिवासी बहुल गाव असलेल्या बोटोणी येथील नागरिकांना स्वच्छ पाण्याची सोय व्हावी म्हणून शासकीय योजनेतून आरो प्लॅन्ट उभारण्यात आला.ग्रामपंचायत प्रशासनाच्या देखरेखीखाली या प्लॅन्ट नियोजन असते.मात्र येथील ढिम्म प्रशासनाच्या बेताल भूमिकेने मागील अनेक दिवसांपासून येथील प्लॅन्ट जवळील दिवे बंद असल्याने नागरिकांना काळोखात अन भितीदायक वातावरणात पाणी नेण्याची नामुष्की ग्रामपंचायतने नागरिकांवर आणून ठेवली आहे.
दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असतांना बहुतांश नागरिक संध्याकाळी पाणी नेत असल्याचा रेशो कायम आहे.मात्र कित्येक दिवसांपासून प्लॅन्ट वरील दिवे बंद आहे.त्यामुळे रात्री भितीदायक वातावरण नागरिकांवर शेकण्याची चिन्हे आहे.किंबहुना कोणतेही सोयरसुतक नसलेल्या ग्रामपंचायत प्रशासनासह येथील स्थानिक लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत असल्याने प्रशासन केव्हा दिवे लावणार ? हा प्रश्न येथे अनुत्तरित असल्याचा नागरिकाकडून आरोप होतो आहे.
नागरिकांची मूलभूत गरजेवर ग्रामपंचायत टाच लावत असून तूर्तास आरो प्लॅन्ट वर नागरिकांना काळोखाचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाप्रती संतापाची लाट उसळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment