खद खद मास्तर…! अबे पोट्टे हो, मी यत हाव मारेगावले

◆ प्रा.नितेश कराळे सर (वर्धा)

◆ मारेगाव तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तथा कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पुढाकार 

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

आपली अस्सल ग्रामीण भाषा आणि सर्वंकष विषयावरील अभ्यासपूर्ण विवेचनाने सर्वांच्या मनावर भुरळ पाडून अधिराज्य गाजविणारे वर्धा येथील खदखद मास्तर प्रा.नितेश कराळे यांचे स्पर्धा परिक्षावरील मार्गदर्शन कार्यक्रम मारेगाव येथे येत्या २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

स्थानिक कला – वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास श्री. रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष अँड. देविदास काळे , लोढा मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटलचे संचालक तथा आदिवासी पुरस्कार प्राप्त डॉ.महेंद्र लोढा स्वागताध्यक्ष राहणार आहे. प्राचार्य डॉ.अविनाश घरडे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहे.प्रेस संपादक , पत्रकार सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष केशवजी सवळकर , जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

प्रा.नितेश कराळे सर यांचे विद्यार्थ्यांना होणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनास तमाम विद्यार्थी तथा नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मारेगाव तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तथा कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment