बसंती…..मारेगाव मे इतने कुत्ते आए कैसे..?

◆ बेवारस कुत्र्यांची शहरात अचानक लक्षणीय वाढ.
◆ वृद्ध अन बालकांना चावण्याचा धोका वाढला

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

गत आठवड्या पासून शहरात अचानक व अनपेक्षितपणे बेवारस कुत्र्यांची खूप वाढ झाली आहे. रस्त्यावर व गल्लोगल्ली 10-15 हिंस्त्र व मोकाट कुत्रे बघून बालक व वृद्ध लोकांत दहशत निर्माण झाली आहे. या कुत्र्यांच्या चावल्यामुळे रेबीज हा भयंकर जीवघेणा आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मारेगावात अचानक एवढे मोकाट श्वान आले कुठून याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील रविवारी पहाटे यवतमाळ राज्य महामार्गावर सरकारी डॉक्टर कॉलनी जवळ एका अज्ञात ट्रक मधून गुप्तपणे हे शेकडो श्वान शहरात सोडुन देण्यात आले आहे.एखाद्या नगर परिषद द्वारे मोहिमेत पकडलेले हे शेकडो धोकादायक कुत्रे असल्याचा अंदाज आहे. मात्र यामुळे मारेगाव च्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी मोठ्याने भुंकत रात्री झोपमोड करीत आहे. नागरिकांना चावा घेण्याची दहशत निर्माण झाली आहे.
नगर पंचायत ने तात्काळ कार्यवाही राबवून हे कुत्रे जवळच्या कोणत्या नगर परिषद मधून येथे अवैधपणे सोडण्यात आले याची माहिती घेऊन या धोकादायक कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment