◆ शिंदे गटाच्या शिवसेनेची तालुका शहर पातळीवर पदाधिकारी नियुक्त करीत संघटन मजबुतीवर भर
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यात शिंदे गट समर्थीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोट बांधण्यासाठी तालुका प्रमुख म्हणून विशाल मनोहर किन्हेकर तर शहर प्रमुख म्हणून विजय उंदरूजी मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्रातील राजकारणात फूट पडून शिवसेना पक्षाची कमालीची उलथापालथ होऊन एकनाथ
शिंदे यांनी शिवसेने सोबत वेगळा घरोबा केला.अशातच स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची आता तालुका पातळीवर शिंदे गट सरसावत असून पक्षाची मोट बांधण्यासाठी मारेगाव तालुक्यात विशाल किन्हेकर व विजय मेश्राम यांचेकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ स्थित बाळासाहेब शिवसेना राज्य सचिव संजय मोरे यांचे स्वाक्षरीनिशी किन्हेकर व मेश्राम यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.परिणामी शिंदे गटाची तालुका पातळीवर संघटन मजबुत करण्यावर नवनियुक्त पदाधिकारी भर देत पक्षाची मोट बांधणार आहे.