मारेगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

◆ शहराला विळखा घालून कँडल मार्च

◆ सामाजिक, राजकीय संघटना व प्रशासकीय अधिकारी यांचेही बाबासाहेबांना वंदन

 

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

अथांग ज्ञानाचा महामेरू , विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मारेगाव येथे विविध सामाजिक संघटन , प्रशासकीय अधिकारी व तमाम उपासक उपासीकांनी पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करीत अभिवादन केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की यांनी करीत बाबासाहेब यांच्या पुतळ्यास नायब तहसीलदार अरुण भगत यांनी पुष्पहार अर्पण करीत यांचे शेकडो उपासक , उपसिका , भीम उत्सव संघटना , समता सैनिक दल , महाराष्ट्र नवनिर्माण सेना , भारतीय जनता पार्टी , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , शामादादा कोलाम संघटना पदाधिकारी सह पोलीस स्टेशन , तहसील प्रशासन , वनविभाग अधिकारी यांनी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अगरबत्ती , मेणबत्ती प्रज्वलित करीत पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली.
स्थानिक धम्मराजिका बुद्ध विहारात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण गोरखनाथ पाटील यांनी केले.उपस्थितांनी बुद्ध रूपाचे पूजन करीत सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.
सायंकाळी सात वाजता शेकडो अनुयायी सहभागी होत शहराच्या सर्वच प्रभागाला विळखा घालीत कँडल मार्च ने बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर सामूहिक बुद्धवंदना घेत महापरिनिर्वाण दिनाची सांगता करण्यात आली.यावेळी आयु.गौरव चिकाटे यांनी आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment