◆ मारेगाव तालुक्यातील घोडदरा निवासी सोडला सुंदराबाई रोगे यांनी अखेरचा श्वास
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष दयाल रोगे यांच्या मातोश्री सुंदराबाई मारोती रोगे यांचे बुधवारला मध्यरात्री ३ वाजताचे सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षाचे होते.
सुंदराबाई रोगे या किरकोळ आजाराने दोन दिवसांपूर्वी अंथरुणावर खिळल्या होत्या.बुधवारला मध्यरात्री तीन वाजताचे सुमारास त्यांनी मारेगाव तालुक्यातील घोडदरा या राहत्या निवासी अखेरचा श्वास घेतला.
घोडदरा येथे स्थानिक स्मशानभूमीत सुंदराबाई रोगे यांचेवर दुपारी १२ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
सुंदराबाई यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, स्नुषा, नातवंड असा आप्तपरीवार आहे.