कोसारा घाटावर पुन्हा एका वाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या

“विटा” इम्फॅक्ट !
 महसूल पथक अँक्शन मोडवर
◆ चिंचमंडळ येथील तस्कर कोसारा घाटात प्रशासनाच्या जाळ्यात 
 विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
सडेतोड लेखणीसाठी नावलौकिक प्राप्त ‘विदर्भ टाईम्स’ने सातत्याने वाळू तस्कर व लाखो रुपयांचा महसुलचा भंडाफोड करण्यासाठी सातत्याने धारदार लेखणीतून भूमिका मांडून प्रशासनास सजग ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न आज पुन्हा अधोरेखित केला.
चार दिवसांपूर्वी दोन वाळू तस्करांना महसूल विभागाने ताब्यात घेतल्यानंतर मुजोर तस्करांनी हा गोरखधंदा कायम ठेवला.मात्र प्रशासन अँक्शन मोड वर येत पथक कार्यान्वित केले.आणि सोमवार च्या रात्रीला वाळू तस्करांचा रात्रीचा खेळ उजेडात आणला.चिंचमंडळ येथील अनिकेत झाडे तस्कराचे ट्रॅक्टर वाहन रंगेहात पकडून जप्त केले.
    मागील अनेक दिवसापासून वाळू तस्करांची टीम कोसारा , चिंचमंडळ येथे धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा महसूल घशात घालत असल्याचे चित्र सर्वश्रुत आहे.
हा गोरखधंदा सुकर करण्यासाठी अनेक तस्करांनी राजकीय पक्षात प्रवेश करीत आसरा घेतला तर मी नव्हे त्यातली म्हणत लोकसेवेचा आव आणत एका तस्कराने नुकताच आंदोलनात सहभाग नोंदवून सातत्याने रात्रीच्या चोरटेपणात शासनाचा मलिंदा लाटत पुढारपण गाजवत आहे.हे येथे मात्र विशेष !
दरम्यान , महसूल विभाग पूर्णतः अँक्शन मोडवर येत तस्करांचे कंबरडे मोडण्याचा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.कोसारा आणि चिंचमंडळ घाट तस्करांच्या अजेंड्यावर असतांना तस्करांनी चिंचमंडळ पासून अवघ्या तीन किमी.अंतरावरील चक्क वर्धा नदीच्या पायथ्याशी मुरूम टाकीत वाळू तस्करीची वाट शोधली आहे.
पोलीस पथक ही रवाना
सोमवारच्या रात्री किर्रर्र अंधारात महसूल पथकाने एका ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केल्याने तस्करांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी थेट तहसीलदार दीपक पुंडे यांनी पोलीस प्रशासनाची मदत घेत पोलीस पथक कोसारा घाटात रात्री साडेदहा वाजता दाखल झाले होते.परिणामी महसूल विभागाने पुन्हा एका वाहनावर जप्तीची कारवाई करीत गर्भित इशाऱ्याचे संकेत दिले आहे.सदर पथकात नायब तहसीलदार अरुण भगत, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल आदींनी कोसारा घाटातील मिशन फत्ते केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment