◆ मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ ठरतेय वाळू तस्करांचे माहेरघर
◆ राजकीय पदाधिकारी यांचीही तस्करीत उडी
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील वर्धा नदी लगत असलेल्या काही गावात वाळू तस्करांचे उभे पीक आले आहे.आपले इप्सित साध्य करण्यासाठी चिंचमंडळ समोरील वर्धा नदीच्या तीरावर वाळूची तस्करी करण्यासाठी चक्क मुरूम टाकून वाहनांसाठी मार्ग सुकर करण्यात आला.रेती तस्कर लाखो रुपयांचा महसूलची हेराफेरी करीत ग्राहकांना अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करीत आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा ‘घाट’ सुरू आहे.
मारेगाव सीमेलगत वर्धा नदीचे पात्र वाळू तस्करांकरिता सोन्याची अंडी देणारी ठरू पाहत आहे. तालुक्यातील चिंचमंडळ , कोसारा येथील तस्कर राजकीय पक्षांची झुली पांघरून हा गोरखधंदा राजरोसपणे करीत आहे.बहुतांश रात्रीचा खेळ करणाऱ्या तस्करांनी प्रशासनाच्या हाती न लागण्यासाठी चौफेर काही किमी.अंतरावर आपले मानवी बुजगावणे सतर्कता बाळगण्याची उभे करीत मोबाईलवर संकेत देत असते.
चिंचमंडळ हे वाळू तस्करांचे माहेरघर ठरत असतांना कोसारा ही मागे नसल्याचे वास्तव आहे.वर्धा नदी तीरालगत आपल्या ट्रॅक्टर वाहनाला अडसर पोहचू नये म्हणून तस्करांनी शक्कल लढवित पन्नास पेक्षा जास्त मुरूम ट्रिप ओतल्या आहे.हजारो ब्रॉस रेती जमा करून शासनाच्या महसूलला चुना लावणाऱ्या तस्करांनी रात्रीचा खेळ मांडला आहे.
प्रशासन आता अँक्शन मोड वर आला असून थेट जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रशासनाने तस्करांचा रात्रीचा खेळ मोडण्याची व्युव्हरचना आखली आहे.