मारेगाव येथे रोजगार मेळावा

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव यांचे संयुक्त विद्यमानाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन ३० नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.
सदर रोजगार मेळाव्याला उद्घाटक म्हणून श्री. नरेंद्र तराळे , अध्यक्ष म्हणून श्री जीवन कापसे, अध्यक्ष शेतकरी शिक्षण संस्था, मारेगाव उपस्थित होते. रोजगार मेळाव्याकरिता एकूण नऊ नामांकित कंपन्या त्यांच्याकडील ७०८ रिक्त पदांकरिता उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड करणार होते. एकूण ४६२ उमेदवारांनी आपली उपस्थिती दर्शवून रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला.तसेच या रोजगार मेळाव्या करिता एकूण ९५९ उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदविला.
मेळाव्यामध्ये महात्मा फुले मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, इतर मागास विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, आणि ओबीसी वित्त विकास महामंडळाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवून उमेदवारांना त्यांच्याकडे असलेल्या विविध कर्ज योजनेची माहिती उमेदवारांना दिली. सदर रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित उमेदवारांपैकी एकूण १९० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. त्यामध्ये क्वेश कॉर्प पुणे ह्या कंपनीमध्ये एकूण ६ उमेदवारांची अंतिम निवड सुद्धा करण्यात आलेली आहे. रोजगार मेळाव्या च्या आयोजक जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती विद्या सा. शितोळे यांनी उपस्थित उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश घरडे यांनी सुद्धा उपस्थित उमेदवारांना उपस्थित उमेदवारांना सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन मुलाखती देनेकारिता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय भगत आणि कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. संतोष गायकवाड , आभार डॉ. सुधीर चिरडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी डॉ. श्रीराम खाडे, डॉ.दिनेश यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच डॉ. माधुरी ताणुरकर, डॉ. विभा घोडखांदे, प्रा. शैलेश कांबळे, प्रा. रुपेश वांढरे, प्रा. स्नेहल भांदक्कर डॉ. मीनाक्षी कांबळे प्रा. नितेश राऊत यांनी पुढाकार घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment