मारेगावातील आंदोलनाला राष्ट्रसंताच्या भजनाची साद..!

◆ शेतकऱ्यांच्या संवेदनशील प्रश्नांसाठी काँग्रेसचे आमरण उपोषण

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मारेगाव प्रशासनातील शेतकऱ्यांच्या संवेदनशील प्रश्नांवर डोळेझाक करीत वेठीस धरणाऱ्या प्रशासनास जागे करण्यासाठी राष्ट्रसंताच्या भजनाने तहसील प्रशासनासमोर काँग्रेसने अभिनव आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाला प्रशासनाकरवी हे अभिनव आंदोलन मात्र दुर्लक्षित आहे.
शेतकऱ्यांच्या विविध संवेदनशील प्रश्न ऐरणीवर असतांना तालुकास्थळावरील सर्वच प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा अनाहूत प्रयत्न करीत असल्याचा आरोप उपोषण कर्त्यांकडून करण्यात येत आहे.यात विजेचा प्रश्न, सिंचन, दुष्काळ निधी, प्रोत्साहन निधी, पीक विमा मदत, आदी प्रलंबित प्रश्नावर शेतकरी पूर्णतः मेटाकुटीस आला आहे. या प्रलंबित प्रश्नावर प्रशासनास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन गात जागे करण्याचा प्रयत्न आंदोलनातुन करण्यात येत आहे.हे अभिनव आंदोलन तहसील परिसरात लक्षवेधी ठरत आहे.बहुतांश राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी आंदोलनास भेट देत पाठिंबा दर्शविला आहे. वृत्त लिहिपर्यंत प्रशासनातील एकही अधिकारी आंदोलन स्थळी फिरकला नसून आंदोलन यशस्वीसाठी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, शकुंतला वैद्य, अरुणाताई खंडाळकर, अरविंद वखनोर, माणिक पांगुळ, शंकरराव मडावी, अंकुश माफुर, प्रफुल्ल विखनकार सह पदाधिकारी, कार्यकर्ते पुढाकार घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment