मारेगाव मनसेची मागणी… अखेर अतिवृष्टी निधी बँकेत वळता

◆ शेतकऱ्यांत समाधानेची छटा 

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

अतिवृष्टीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली.मात्र प्रशासनाकरवी त्याचा पारदर्शक अंमल होत नसल्याचा आरोप मारेगाव मनसे ने केला.याकरिता थेट रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत तब्बल शेतकऱ्यांचा अतिवृष्ठीचा निधी तहसील प्रशासनाकडून बँकेला वळता करण्यात आला.
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्ठीने उभे पिके होत्याचे नव्हते झाले त्यामुळे येणाऱ्या दिवसात कसा गाडा हाकावा या विवंचनेत शेतकरी आकंठ बुडाला.अशातच विरोधीपक्ष नेत्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी , पदाधिकारी बांधावर जाऊन वास्तव शासनाच्या निदर्शनास आणून देत शासनाने अतिवृष्ठीची मदत जाहीर केली.
मारेगाव तालुका प्रशासनाकडे तालुक्यातील एकूण शेतकऱ्यांचा निधी प्राप्त झाला.कर्मचाऱ्यांच्या चालढकलपणाने काही शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी केला.नव्हे तर यासाठी रस्त्यावर उतरण्याचा गर्भित ईशारा देण्यात आला.
परिणामी, आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने जवळपास शेतकऱ्यांचा निधी मध्यवर्ती बँक , स्टेट बँक व सेंट्रल बँक मध्ये वळता केला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या न्यायिक भूमिकेने शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने सर्वत्र शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.प्रलंबित मागणीसाठी जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष नबी शेख, चांद बहादे, विलास रायपूरे, गजानन चंदनखेडे, किशोर मानकर, संतोष राठोड आदींनी पुढाकार घेतला.

 

एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन सज्ज : तहसीलदार दिपक पुंडे

अतिवृष्ठी निधी साठी शेतकऱ्यांना संमतीपत्र, चुकीचे खाते, अपात्र खाते, किरकोळ चुका आदी उपाययोजना अमलात आणून मारेगाव सह मार्डी, कुंभा, घोंसा येथील बँकेत निधी सह धनादेश मागील चार दिवसांपूर्वी पाठविण्यात आला.यापुढे तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे.

दिपक पुंडे

तहसीलदार, मारेगाव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment