शेतकऱ्यांने घेतला शिवारात विषाचा घोट

◆ चंद्रपुर येथे उपचारादरम्यान सोडला अखेरचा श्वास

◆ मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील घटना

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

सातत्याने घट येत शेतीवर विसंबून असलेल्या शेतकऱ्याने विषाचा घोट घेत इहलोकाची यात्रा केल्याची दुर्देवी घटना मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे उघडकीस आली.
कैलास नानाजी खोके (४५) असे विष प्राशन करून जीवनयात्रा संपविलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
त्यांचेकडे असलेल्या नऊ एकर शेतीवर खोके दाम्पत्य विसंबून होते.मात्र नैसर्गिक संकटाने शेती मेटाकुटीला आली.यातच सोसायटी आणि खासगी कर्जाचा दिवसागणिक डोंगर वाढत असतांना मागील काही दिवसांपासून कैलासराव अस्वस्थ असायचा.
रविवारला पती पत्नी शेतात असतांना सायंकाळी साडेचार वाजताचे दरम्यान विष प्राशन केले.काही क्षणात भोवळ आल्यागत पत्नीच्या लक्षात आले.भेदरलेल्या अवस्थेत पत्नीने आरडाओरडा करीत शिवारातील शेतकरी जमा होत मारेगाव रुग्णालयात हलविले. प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने कुंभा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment