कोसारा रेती घाटावर दोन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

◆ रात्रीचा अवैध उपसा : महसूल पथकाचा छापा

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

कोसारा बहुचर्चित रेती घाटावर चिंचमंडळ येथील रेती तस्कर अलगद महसूल पथकाच्या जाळ्यात रविवारच्या रात्री अडकल्याने अवैध तस्करात खळबळ उडाली आहे.परिणामी दोन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
मारेगाव तालुक्यातील कोसारा रेती घाट आजतागायत अधिकृतरित्या सुरू नसल्याने येथील नदीपात्रातील वाळूवर परिसरातील तस्करांची करडी नजर आहे.अशातच मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील तस्करांनी रात्रीचा खेळ चालवीत शासनाच्या महसूलला जबर चुना लावीत लाखो रुपयांची वाळू गिळंकृत केल्याचे सर्वश्रुत आहे.
दरम्यान , चिंचमंडळ , कोथुर्ला , कोसारा व खैरी येथील वाळू तस्करांच्या अजेंड्यावर कोसारा घाट असल्याने अवैध वाळूसाठी रात्रीचा खेळ हा नित्याचाच झाला आहे.
मागील अनेक दिवसांपासून महसूलच्या रडारवर असलेल्या नायब तहसीलदार अरुण भगत, तलाठी शेख, कोतवाल, पोलिस पाटील यांच्या पथकाने रविवार रात्रीला कोसारा रेती घाटावर छापा टाकत चिंचमंडळ येथील विखनकर व चौधरी यांचे ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू तस्करी करतांना जप्तीची कारवाई केली.तूर्तास यातील एक वाहन ग्रामपंचायत कार्यालयात असून दुसरा ट्रॅक्टर रात्री घाटात फसल्याने घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.मात्र वाळू तस्करांनी हा ट्रॅक्टर आज पहाटे इतरत्र हलविला असल्याची माहिती पोलीस पाटील गाणार यांनी ” विदर्भ टाईम्स ” दिली.
महसूल विभागाच्या कारवाईने वाळू तस्कर धडा घेईल का ? हा खरा प्रश्न गौण असला तरी महसूल प्रशासनाकरवी कारवाईचा बडगा कायम राहील असे सूतोवाच नायब तहसीलदार अरुण भगत यांनी केले.तूर्तास जप्तीची कारवाईने वाळू तस्करात खळबळ माजली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment