मारेगाव येथे २ जानेवारीला ‘वादळवारा’

◆ विद्रोही व क्रांतिकारक गायक अनिरुद्ध वनकर यांची प्रबोधनात्मक मेजवानी

विटा न्यूज नेटवर्क- मारेगाव 

भिमा कोरेगाव शौर्यदिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे २ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय प्रबोधनकार , वादळवारा फेम तथा विद्रोही क्रांतिकारक गायक अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

भिमा कोरेगाव येथील शहीद हुतात्म्यांच्या बलिदानाची शौर्यगाथा समाजमनात कायम तेवत रहावी , त्यांच्या आहुत्यांना उजाळा देण्यासाठी हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित असून या कार्यक्रमाचे अनुषंगाने परिसरातील जनतेला वैचारिक प्रबोधनाची मेजवानी अधोरेखित होणार आहे.

२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या राज्य महामार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रांगणातील प्रबोधनात्मक कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.मारेगाव फुले – शाहू- आंबेडकर प्रबोधन विचार मंच तथा मारेगाव ,वणी , झरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या सयुक्त विद्यमाने होणाऱ्या कार्यक्रमासाठी अनुयायी व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुढाकार घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment