मारेगाव तालुक्यात वाघाचा वावर

मानव -वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता

◆ शेतकरी शेतमजुरात दहशत

विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यात मागील काही दिवसापासून वाघाचे दर्शन होत आहे. तर शेतकऱ्यांचे पशुधन वाघाचे भक्ष बनत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे मानव -वन्यजीव संघर्ष होण्यापूर्वी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. मारेगाव तालुक्यातील खडकी (बुरांडा), खेकडवाई या जंगलव्याप्त परिसरामध्ये वाघाचा वावर चांगलाच वाढला आहे. आज 26 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान शेतकऱ्यांना वाघाचे थेट दर्शन झाले. दर्शन होतात शेतकऱ्यांनी शेतातील कामे टाकून आल्यापावली घराकडे धाव घेतली. तर वाघोबाणे गावा लगतच्या डोंगराकडे धाव घेतल्याचे प्रत्यक्ष दर्शनी चे म्हणणे आहे. यामुळे भागातील शेतकरी ,शेतमजुरांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. त्यातच शेतीची कामे खोळबल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने वाघोबाला जेर बंद करावे अशी मागणी जोर धरत आहे.

दिवसा विजेची मागणी
अतिवृष्टीने पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. पिकेही जोमदार आली आहे पिकांना जगण्याकरिता रात्रीला वीज मिळत असल्याने शेतकरी जीव धोक्यात घालून ओलीत करीत आहे. मात्र वाघाच्या एंट्रीने वन्य प्राणी व मानव संघर्ष होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment