श्रमदानातून वनराई बंधारा निर्मिती

 

 – वनविभागाचा पुढाकार

बोटोणी : सुनिल उताणे 

3 नोव्हेंबर रोजी वनविभाग पांढरकवडा जलसंधारण व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने मारेगाव वनपरीक्षेतत्रातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.

 

बि. एन. स्वामी उपवनसंरक्षक पांढरकवडा वनविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एस.ए.कोकणे मॅडम सहाय्यक वनसंरक्षक वणी, सि. बि. खेरडे वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) मारेगाव यांच्या मार्गदर्शनात एस.ए.मुंडाले वनपाल, वनरक्षक प्रमोद चुकलवार, वंदना मेश्राम, अर्चना मडावी, रोशन मंगाम व वनमजूर पोतू टेकाम, गजानन घोडाम, स्वप्निल तोडासम, नामदेव रामपुरे, शामराव टेकाम यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रमदानातून हा उपक्रम यशस्वी केला.

 

विशेष म्हणजे, संपूर्ण दिवसभर श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण नाल्याची पाहणी करण्यात आली व पांढरदेवी मंदिर परिसरातील नाल्यातील कचरा व प्लॅस्टिक कचरा गोळा करून जाळण्यात आला.

 

वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी – अडविणे, जमिनीत पाणी मुरविणे, भूजल पातळीत वाढ करणे तसेच वनक्षेत्र व परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करणे व वन्यप्राणी आणि पशुपक्षी यांना दुष्काळात पाण्याची मदत होईल हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

वनसंवर्धनासोबत जलसंवर्धनाची जबाबदारीही सर्वांच्या सहभागातून समर्थपणे पार पाडावी.यावेळी जलसंधारनातून समृद्धीचा मार्ग, पाण्याच्या प्रत्येक थेंबातून हरीत भविष्याचा संकल्प करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment