– शिवसेना तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव शिवसेना (शिंदे गट )तालुकाप्रमुख विशाल मनोहर किन्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव येथे उद्या मंगळवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मोफत सर्वरोग निदान, शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडी शाखा, मारेगाव तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
स्थानिक हनुमान मंदिर परिसर, नगरपंचायत कार्यालय समोर
सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणाऱ्या
शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मारेगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.