– सगणापूर फाट्यानजीकची घटना
– शोकमग्नात बुडाला अर्जुनी गाव
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील अर्जुनी येथील युवकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारला सायंकाळच्या सुमारास सगणापूर फाट्या नजीक घडली. कुटुंबातील एकुलत्याएक मुलाच्या करून अंताने अर्जुनी गावात पुरती शोककळा पसरली आहे.
अनिकेत सुशांत तलांडे (20) रा. अर्जुनी असे मृत युवकाचे नाव आहे.
अनिकेत हा गावावरून शेताकडे सायंकाळी पाच वाजताचे सुमारास जात होता.सगनापूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाने अनिकेतच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात तो रस्त्याच्या कडेला जावून पडला. गंभीर आणि जबर दुखापतीने अनिकेत जागीच गतप्राण झाला.
कुटुंबाचा एकुलता एक आधारवड असलेला अनिकेत होतकरू होता. आईवडिलांना शेतात सदैव मदत करणाऱ्या दुर्देवी घटनेने गावकुस पुरता शोकमग्न आहे. परिणामी, मृतकाच्या पश्चात आईवडील व एक बहीण आहे.