बाथरूमधील गळफासाची झुंज ठरली अपयशी

 

– अकरा महिण्याची छकुली झाली मातेविना पोरकी 

– मन हेलावणाऱ्या घटनेने मारेगावात हळहळ 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

मारेगाव येथील प्रभाग 13 मधील विवाहित महिलेने बाथरूमध्ये गळफास घेतला असता पतीने गळफास सोडताच तीला चंद्रपूर येथे हलविले मात्र तब्बल पाच दिवसाच्या झुंजीनंतर आज मंगळवारला सायंकाळी 5:30 वाजताचे दरम्यान तिची प्राणज्योत मालविली.या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आचल अभिजित मांडवकर (20) गळफास घेवून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

येथील प्रभाग 13 मध्ये वास्तव्यात असलेले मांडवकर कुटुंबातील आचल हिने गेल्या 6 आँगष्ट रोजी सकाळी 10 वाजता बाथरूममध्ये स्कार्पच्या सहाय्याने गळफास घेतला.यावेळी अकरा महिण्याची छकुली पाळण्यात निद्रावस्थेत होती. पतीही घरात असतांना बराच उशीर झाल्याने आचल आली नाही म्हणून बाथरूमच्या खिडकीतून डोकावून पाहताच गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.लागलीच दरवाजा तोडून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले.

 

प्राथमिक उपचारांनंतर चंद्रपूर येथे हलविल्या नंतर आचल ही व्हेंटिलेटरवर होती. मात्र प्रकृतीत किंचितही सुधारणा नसतांना पाच दिवसाच्या झुंजी नंतर आज अखेरचा श्वास घेतला.

 

अवघी अकरा महिण्याची छकुली असतांना आचलने टोकाचे पाऊल का घेतले? याबाबत सर्वच अनभिज्ञ आहे.मृतक आचलच्या पश्चात छकुली सह पती व सासू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment