– जानकाईपोड येथे अर्धा डझन नागरिक करताहेत बेकायदेशीर कृत्य
– भाजपा च्या नेतृत्वात प्रशासनास तक्रारी
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
शतकानुशतके वसलेलं मारेगाव तालुक्यातील खंडणी गट ग्रा. पं. मध्ये येत असलेलं जानकाईपोड (मेंढणी) गाव गत काही दिवसापासून संघर्षाच्या वणव्यात पेटले आहे. येथील काहीजण हातात कायदा घेत मूलभूत सोयीपासून नागरिकांना कोसोदूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याने अख्ख्या गावाने प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात सोमवारला दिलेल्या तक्रारीत ‘त्या’ अर्धा डझन लोकांवर कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली.
जानकाई हे शंभर टक्के कोलाम समाजाच्या जमातीच वसलेलं (पोड)गाव. येथे शतकापासून मालकी हक्काचे घरं असून मालगुजार- इजाराने वास्तव्य आहे. येथील नागरिक आपल्या घराच्या मालमत्तेचा कराचा भरणा नियमितपणे शासकीय दप्तरी करतोय मात्र शतकापासून मालकी हक्काचे घरं असलेल्या आणि गुण्यागोविंदाने वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या वाट्याला धमकाविण्याचे, अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न येथील सहा लोंकाकडून करण्यात येत आहे.
किंबहुना मालमत्तेच्या शासकीय नोंदी अद्यावत कामात व कायदा हातात घेत ग्रामस्थांना धमकाविणे नव्हेतर मूलभूत गरज असलेली व अधिग्रहित केलेल्या शेतातील विहिरीतून पाणी वापरास मनाई करून जलवाहिनीची तोडफोड करणे आदी प्रकार येथील काही लोंकाकडून बेकायदेशीरपणे होत असल्याचा येथील नागरिकांनी तक्रारीतून आरोप केल्याने विकासाला बाधा व मूलभूत गरजेपासून वंचित ठेवणाऱ्या या सहा समाजकंटकावर कडक शासन करून न्यायिक भूमिका प्रदान करावी अशा आशयाची तक्रार मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट,ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती गौरकार,तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, दयाल रोगे यांच्या नेतृत्वात असंख्य गावकऱ्यांनी प्रशासनास दिले आहे.