
– मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथील घटनेने पंचक्रोशीत हळहळ
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
काही वर्षांपासून प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमयुगुलांनी सात जन्माच्या गाठी बांधल्या. महिन्याभरापूर्वी वणीत लग्नाच्या बेडीत अडकलेल्या नवं दाम्पत्यांनी थेट विहिरीत उडी घेत जीवनाचा अखेर केल्याची हृदयद्रावक तालुक्यातील सगणापूर येथे घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आशिष रमेश धानोरकर (26) व करिष्मा आशिष धानोरकर (22) असे आत्महत्या केल्या पती पत्नीचं नावं आहे.
आशिष हा रोजमजुरी करायचा. कॅटरर्सच्या कामातही तो मजुरी कमवायचा.ह्याच कामात वणी येथील करिष्माही नियमित असायची. येथेच दोघांचे सूत जुळले. प्रेमाला बहर येत असतांना त्यांनी हानाभाका घेत सात जन्माची गाठ बांधण्याचा निर्णय घेतला. गत 6 मे 2026 रोजी ते वणी येथील एका मंगलकार्यालयात विवाहबद्ध झाले.रोजमजुरी करून आयुष्याला आकार देत सुखी संसाराची स्वप्ने रंगवित असतांना सोमवारी सायंकाळी सगणापूर येथून वणी जाण्याच्या बेतात बाहेर पडले. मात्र वणी न जाता सगणापूर शिवारात असलेल्या एका विहिरीत दोघांनीही उडी घेत जीवनाचा अखेर केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ठ असले तरी अंगावरील हळद सुकण्यापूर्वीच्या या हृदयद्रावक घटनेने तर्कवितर्कांना उधाण आले असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.