सिद्धांत संजय तेलतूमडे लिखित पुस्तकाचे विमोचन

आ.संजय देरकर, डॉ. भालचंद्र चोपने यांची प्रमुख उपस्थिती 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

वणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय तेलतूमडे यांचे चिरंजीव सिद्धांत तेलतूमडे लिखित WHATS IF EVERYTHING YOU YOU WERE TAUGHT IS SLIGHTLY WRONG? ( जर तुम्हाला शिकवले गेलेले सर्व काही थोडेसे चुकीचे असेल तर? ) वाचकांच्या मनात कुतूहल आणि विचारांची ठिणगी पेटवणारे शीर्षक असलेल्या या पुस्तकाचे रविवार दि.19 ला वणी येथे विमोचन करण्यात आले.

 

माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रकाशन सोहळ्यात , आमदार संजय देरकर, प्राचार्य सुशील बुजाडे, प्राचार्य गजानन राजूरकर, मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, आरोग्य अधिकारी डॉ. समीर थेरे, वंदना गाणार यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी आजच्या डिजिटल युगात पुस्तक वाचन संस्कृती लोप पावत असतांना मानवी प्रगती, मानसिक स्वास्थ आणि वैयक्तिक विकासासाठी वाचन हे काळाची गरज बनली आहे.सततची स्क्रीन टाईम आणि सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे आजच्या पिढीची एकाग्रता लयास जात आहे. धावत्या व तणावपूर्ण जीवनशैलीत ‘वाचन’ हा मनाला शांत करण्याचा आणि एकाग्रता वाढविण्याचा उत्तममार्ग सिद्धांत ने सदर पुस्तक लिहून समृद्ध ज्ञान, सामाजिक व सांस्कृतिक जाणीवा प्रगल्भ केल्या. एक संवेदनशील व सुजान नागरिकाचे द्योतक बनलेल्या सिद्धांत हा लेखन आणि लेखक म्हणून आगामी काळात फिनिक्सझेप मारेल असा आशावाद मंचावरील मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य संजय तेलतूमडे तर दीपक डोहणे यांनी आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment