Breaking News

मारेगावात विजयस्तंभाची प्रतिकृती…भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानाची निळी सलामी

 

– विजयस्तंभ लढ्याचे कसा प्रतीक बनला वाचा ‘विटा’ वर 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त येथे ऐतिहासिक विजयस्तंभ उभारण्यात येवून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी शेकडो अनुयायी नतमस्तक होवून समता सैनिक दला कडून सलामी देण्यात येवून विजयीस्तंभाला निळी सलामी देण्यात आली.

शौर्य दिनानिमित्त जयंतीउत्सव समितीच्या वतीने आयोजित भीमा कोरेगाव विजस्तंभाची प्रतिकृती लक्षवेधी ठरली.येथील बुध्द विहारातून वणी – मारेगाव येथील समता सैनिक दला

कडून रूट मार्च काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी उभारलेल्या विजयस्तंभाला सलामी देण्यात आली. याप्रसंगी आमदार संजय देरकर प्रामुख्याने उपस्थित राहून विजयस्तंभाला श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी गोंडपिंपरी येथील आंबेडकरी विचारवंत अँड. अक्षय उराडे यांनी शौर्य दिन पर्वावर समाजाचे राजकीय, सामाजिक व आर्थिक विवेचन करून व्यवस्थेवर प्रहार केला. अलीकडच्या प्रासंगीकक्षणी आजचा काळ संधी व संकट यांचा थरारक कसरतीवरील तोल सांभाळत उभा असतांना

या भयावह स्थितीत आत्मसंरक्षण तलवारीच्या संघर्षाचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले.याप्रसंगी आयु. तात्याजी चिकाटे, आयु. उदय रायपुरे, आयु. ज्ञानेश्वर मुन, आयु. हेमंत नरांजे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव चिकाटे, प्रास्ताविक दीपक डोहणे तर हेमंत नरांजे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी चांद बहादे ओमप्रकाश पाटील, गजानन चंदनखेडे, विलास रायपुरे, ज्ञानेश्वर धोपटे आदींनी पुढाकार घेतला.

भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा 1 जानेवारी 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या सैन्यात झालेल्या युद्धात 500 महार सैनिकांनी 28000 पेशव्यांचा पाडावा केला होता. या स्मरणार्थ उभारलेला हा स्तंभ. ज्यात महार सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. हा “स्तंभ” महार समुदयासाठी शौर्य, सामाजिक, न्याय आणि पेशवा अत्याचार विरुद्ध लढ्याचे प्रतीक बनला आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये भेट देवून त्याचे महत्व पुन्हा अधोरेखित केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment