Breaking News

सुविधेचा अभाव.. ग्राहक संतापले , प्लॉटची रक्कम परत देण्यास टाळाटाळ

 

– प्लॉट ग्राहकाची पोलिसात तक्रार 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

लेआउट मध्ये मूलभूत सोयीचा गाजावाजा करून प्लॉट बुकिंगचा गोरखधंदा चालविलेल्या लेआउट भागीदाराच्या विरोधात रक्कम परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार मारेगाव पोलिसात करण्यात आली.

 

मारेगाव लगत कान्हाळगाव येथील गट क्रं. 47/48 मध्ये निवासी उपयोगाकरिता सर्व सोयीने सरकार मान्य लेआउट अशी जाहिरात करून प्लॉटची बुकिंग सुरु करण्यात आली मात्र यात कोणतीही सुविधा नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

मारेगाव येथील ग्राहक दीपक शेंडे यांनी 21000 रु. देऊन प्लॉट क्रं. 6 बुक करून किमान चार महिन्याचा कालावधी लोटला आहे.दरम्यान, येत्या आठ दिवसात वीज, पाणी, रस्ते व गार्डन चे कामे सुरु करण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिले मात्र, सुविधेचा अभाव असल्याने ग्राहकात संतापाची लाट उसळत व खोटे आश्वासन दिल्याने शेंडे यांनी खांडेकर यांचे विरोधात तक्रार दाखल केली.

 

परिणामी, लेआउट मध्ये कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने सदर तक्रारदाराने बुकींग केलेली रक्कम परत मागितली मात्र लेआउट भागीदार प्लॉटचा करारनामा करण्याची बळजबरी करीत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

 

सुविधा नसलेल्या लेआउट ची सखोल चौकशी करून सदरील रक्कम तात्काळ परत करण्यात यावी व ग्राहकांची होत असलेल्या फसवणूकीला आळा बसवावा अशा आशयाची तक्रार दीपक शेंडे यांनी केली आहे. त्यामुळे हे असुविधा लेआउटचे प्रकरण कोणते वळण घेते याकडे बुकिंग केलेल्या व संभाव्य ग्राहकाचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment